Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ने केला जल्‍लोष #chandrapur

उत्‍तराखंड, उत्‍तरप्रदेश, गोवा, मणिपूर या चार राज्‍यामध्‍ये विधानसभेत बहुमताने विजयी केल्‍याबद्दल जनतेचे आभार:- सौ. अंजली घोटेकर
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- देशाचे पंतप्रधान, देश गौरव नरेंद्रभाई मोदी यांच्‍या नेतृत्‍वात भारतीय जनता पार्टीने योगीजींच्‍या नेतृत्‍वात उत्‍तरप्रदेशात नेत्रदिपक यश प्राप्‍त करत बहुमताने आपले सरकार निवडुन आणले तसेच मणिपुर, गोवा, उत्‍तराखंड या चार राज्‍यातील विधानसभेत भारतीय जनता पार्टी बहुमताने निवडून आलेली आहे. याचा जल्‍लोष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा द्वारे दि. १० मार्च २०२२ ला तुकूम चंद्रपूर येथे जल्‍लोष करण्‍यात आला. यावेळी महानगराचे अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजप महिला मोर्चा महानगर अध्‍यक्ष सौ. अंजली घोटेकर, विठ्ठठलराव डूकरे, वर महामंत्री सौ. शिला चौहाण, महामंत्री सौ. प्रज्ञा गंधेवार, उपाध्‍यक्षा सौ. प्रभा गुडधे, सौ. रेणु घोडेस्‍वार, लिलावती रवीदास, सौ. किरण बुटले, सौ. विशाखा राजुरकर, चंद्रकला सोयाम, सौ. चंद्रकला सोयाम, सौ. मंजुश्री कासनगोट्टूवार, सचिव सिंधु राजगुरे, शुभांगी दिकोंडवार, मोनिषा महातव, रंजिता येले, कविता जाधव, सौ. स्मिता रेभनकर, सौ. वर्षा सोमलकर, माया बुरडकर, नगरसेविका सौ. सविता कांबळे, सौ. माया उईके, सौ. वनिता डूकरे, सौ. शितल गुरनुले, सौ. पुष्‍पा उराडे, शितल कुळमेथे, अनुराधा हजारे, वंदना जांभुळकर, संगीता खांडेकर, कल्‍पना बगुलकर, सौ. वंदना संतोषवार, सौ. खुशबु चौधरी, सौ. आशा आबोजवार, सौ. कविता सरकार, महिला भजन मंडळाचे ज्‍योती उगेमुगे, सास्‍तीकरताई, मंदा जिवतोडे, सौ. राठोडताई आणि असंख्‍य महिला या जल्‍लोषात उपस्थित होत्‍या. मा. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जयजयकार करत भारत माता की जय या घोषणा देत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने एकमेकांना शुभेच्‍छा देत हा जल्‍लोष साजरा केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत