Top News

जागतिक महिला दिन साजरा #pombhurna


पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे महिला अध्ययन सेवा केंद्र व आय. क्यु. ए. सी. यांच्या विद्यमाने 8 मार्च 2022 ला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महिलादिनी कष्टकरी सक्षम महिलांचा सत्कार करणे, त्यांच्या उन्नत कार्याची पावती देत, हाच महिला समूहातर्फे आयोजित कार्यक्रमाचा उद्देश असतो.

त्यासाठी संकल्प लोकसंचालित साधन केंद्र पोंभूर्णा येथील महिलांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सौ. रोहिणी खोब्रागडे, सौ. पवित्रा खोब्रागडे, सौ. उर्मिला मार्गोनवार, सौ मीनाक्षी इप्पलवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच कार्पेट उत्पादन व्यवसाय भरभराटीसाठी कामगार आपले पुर्ण कौशल्य पणास लावीत आहेत असे व्यवस्थापक सौ. वंदना नथुजी बावणे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. पद्मरेखा धनकर वानखेडे मराठी विभाग सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर यांनी लिंगभेद व लिंगभाव या विषयावर सुंदर मार्गदर्शन विद्यार्थी तसेच उपस्थितांना केले. स्त्रीकडे एक देह म्हणून बघण्यापेक्षा तिला व्यक्ती म्हणून बघा असे आवाहन त्यांनी केले.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. राजीवा वेगीनवार यांनी प्रत्येक महिलेला योग्य सन्मान मिळालाच पाहिजे असे प्रतिपादन केले. तसेच युनिटला व सदस्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मेघा कुलकर्णी यांनी केले तर संचालन डॉ. सुप्रिया वाघमारे यांनी केले तर आभार प्रा. सरोज यादव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. वर्षा शेवटे, डॉ. वैशाली मुरकुटे,  ईश्वरी उराडे त्याच प्रमाणे महाविद्यालयाचा प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने