जाहिरात... Advertisement... विज्ञापन

मनसेचा वर्धापण दिवस पाणपोई व पक्षप्रवेशानी साजरा #Chandrapur

चंद्रपूर:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ मार्च २०२२ ला १६ वा वर्धापन दिवस पुणे इथे राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात साजरा झाला. वर्धापनदिनाच्ये अवचित्त साधून चंद्रपूर इथे मनसे महीला सेना चंद्रपूर शहर उपाध्यक्षा सौ.वाणीताई सदालावार यांच्या नेतृत्वात महाकाली कॉलरी परिसरात केक कापून व पाणपोईचे उदघाटन करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. व त्यानंतर मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाकाली कॉलरी प्रभागातील काही महिला व पुरुषांनी मनसे मध्ये पक्ष प्रवेश केला.
त्या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटन म्हणून मनसे महिला सेना जिल्हाध्यक्षा सौ.सुनिताताई गायकवाड, मनसे जिल्हासचिव श्री.किशोरभाऊ मडगुलवार, पोंभुर्णा तालुका अध्यक्ष आशिष नैताम,जिल्हा सचिव अर्चनाताई आमटे,विभाग अध्यक्ष वर्षा ताई भोमले रुग्णमित्र क्रिष्णा गुप्ता, तालुका उपाध्यक्ष प्रविन शेवाते, तालुका उपाध्यक्ष सचिनभाऊ बाडस्कर, शहर उपाध्यक्ष महेश गडपेल्लीवार, राजु येरले, शंकर भडके, अनुरोज रायपुरे, आशा गडपेल्लीवार, सुजाता येलपुला, साहील भारती, शैलेश सदालावार व इतर महाराष्ट्र सैनिकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत