मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिवस साजरा #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक निकलेश चौधरी यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपुर संस्थेच्या वतीने चंद्रपूर तालुक्यात "SCALE" कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा कार्यक्रम मागील अनेक वर्षा पासून सातत्याने राबविला जात आहे.

त्याच अनुषंगाने दि. ०८ मार्च २०२२ ला जागतिक महिला दिना निमित्य चंद्रपूर तालुक्यातील नगाळा, गोंडसावरी, पिंपलखुट, अजयपुर, चीचपल्ली, बोर्डा, चेकनिंबाडा, जूनोना, लोहारा, इत्यादी गावांमध्ये महिला दिनाच्या निमित्याने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात महिलांसाठी कब्बडी, थ्रो बॉल, संगीत कूर्ची, उंच उडी, लिंबुत चमच, फॅशनशो, डान्स इत्यादी गेम घेण्यात आलेे. स्त्री ही घराचं घरपण असते, संस्कृती असते आणि उद्याचे भविष्य घडविण्याच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्यामुळे स्त्रियांना हक्काचे व्यासपीठ लाभावे जेणेकरून त्या आपल्या अंगी असलेली कलागुण सादर करतील. अशा हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्या मध्ये संपूर्ण तालुक्यातील अधिकाधिक महिलांचा सहभाग होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी केंद्र प्रमुख आणि गावातील सरपंच उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील उपसरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स,शाळेतील शिक्षक वृंद,ग्रामसंघातील महिला व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचा उद्देश  असे की कार्यक्रमात बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या, महिलांना खेळाच्या माध्यमातून आपले कलाकौशल्य सादर करण्यासाठी संधी उपलब्ध झाली, सोबतच शिक्षणाचे महत्व लक्षात आले.
     सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळा साहाय्यक अधिकारी नालंदा बोथले व मॅजिक बस संस्थेचे समुदाय समन्वययक यांनी प्रयत्न केले.