राज्यसरकार ने सादर केलेला अर्थसंकल्प दिशाहीन:- डॉ.मंगेश गुलवाडे #chandrapur

Bhairav Diwase
राज्यातील आघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प विकासाच्या मुद्द्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न असून दिशाहीन अर्थसंकल्प असल्याचे मत भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सांगितले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री असतांना अनेक लोककल्याणकारी प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात सुरू केली होती त्यातील काही प्रकल्प निधी अभावी अपुरे आहेत आणि अशा प्रकल्पांसाठी कुठेही नियोजन या अर्थसंकल्पात दिसत नाही व चंद्रपूर जिल्ह्यासाठी कुठलाही नवीन प्रकल्प देखील प्रस्तावित केलेला नाही त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षांचे भंग झाल्याचे भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना सांगितले