Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यीनीची गळफास घेत आत्महत्या #suicide

आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
वरोरा:- वरोरा शहरालगत असलेल्या बोर्डा ग्रामपंचायत हद्दीतील आराध्य लॉन मागच्या बाजूस असलेल्या एका स्थानिक विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सदर घटना दिनांक 10 मार्च 2022 ला सायंकाळी 6 ते 7 वाजताच्या सुमारास घडली.
🌆
हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालय वरोरा येथे इयत्ता 12 वीच्या वर्गात शिकत असलेल्या अनन्या चंद्रशेखर चिमुरकर वय 18 वर्ष हिने आपल्या राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. अनन्या हि नुकतेच बारावी बोर्डाच्या परीक्षेचे दोन पेपर दिले, उर्वरित चार पेपर बाकी होते. 🌆
 घटनेच्या दिवशी भाऊ ड्युटीवर गेला होता व तिची आई घरी आपल्या कामात व्यस्त असतांना तिने गळफास घेतला असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. कुठल्या कारणांमुळे गळफास घेतला हे अद्याप कळू शकले नसून पुढील तपास वरोरा पोलिस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत