Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

नेरी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर आक्षेप असल्यास कळविण्याचे आवाहन #chandrapur

चंद्रपूर:- नगर विकास विभागाच्या दि. 24 मार्च 2022 अन्वये शासनाने महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम,1965 मधील तरतुदीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील मौजे नेरी (ता. चिमूर) या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे संक्रमात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी आणि उक्त क्षेत्रासाठी नेरी ग्रामपंचायत या नावाने नगरपंचायत गठित करण्याच्या दृष्टीने प्राथमिक उद्घोषणा प्रसिद्ध केली आहे.
या उद्घोषणेला आक्षेप घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीत तहसीलदार, चिमूर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे त्याबाबत लेखी कारण सादर करणे आवश्यक असेल. या कालावधीत न मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत