Top News

संतप्त इंदिरा नगर वासियांचे प्रदूषणा विरोधात चक्का जाम आंदोलन #chandrapur


आम्ही वेकोली वासियांच्या सदैव पाठीशी:- संजय तिवारी
चंद्रपूर:- शनिवार 26 मार्च रोजी सकाळी 8 वाजता घुग्घुस येथील वेकोलि वसाहतीच्या इंदिरा नगर येथील संतप्त महिलांनी वेकोलिच्या रेल्वे सायडींगच्या प्रदूषणा विरोधात कारगिल चौका जवळ चक्का जाम आंदोलन केले.
इंदिरा नगर वसाहत ही वेकोलिच्या जुन्या रेल्वे सायडींग जवळ असल्याने वार्ड वासियांना प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथे राहणाऱ्या महिला व लहान मुलांना प्रदूषणामुळे दमा, त्वचा रोग अश्या आजारांचा सामना करावा लागत आहे रस्त्यावर कोलश्याचा धूळ साचून राहतो. त्यामुळे वेकोलिच्या अधिकाऱ्यांना मागील तीन ते चार दिवसापासून ही समस्या सांगण्यात आली परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने येथील संतप्त महिलांनी रस्त्यावर उतरून चक्का जाम केला व प्रदूषण कमी करून समस्या सोडविण्याची मागणी रेटून धरली.
सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत तब्बल 4 तास वाहतूक रोखून धरल्याने व चक्का जाम आंदोलन सुरु केल्याने कोळशाच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. उप क्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे व पो. नि. बबन पुसाटे यांनी आंदोलकांची चर्चा केली. दरम्यान मागण्या मान्य करण्याचे आश्वासन वेकोलितर्फे देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी भाजपाचे भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, राजकुमार गोडसेलवार, सिनू इसारप, शाम आगदारी, श्रीकांत सावे, गुड्डू तिवारी व वार्डवासी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने