छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिला सुरक्षित होत्या:- डॉ. अंकुश आगलावे #bhadrawati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिला सुरक्षित होत्या असे प्रतिपादन केंद्रीय मानवाधिकार संघठन नवी दिल्लीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे यांनी केले.
ते वरोरा येथील सेवा गुुपच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. आयोजन करण्यात आले होते. डॉ. अंकुश आगलावे पुढे म्हणाले की, ३५० वर्षांपूर्वी रायगडावर शौचालयाची व्यवस्था होती. याचे उदाहरण देत प्रत्येक गांव हागनदारी मुक्त झाला पाहिजे असे सांगितले.
 सेवा ग्रुप आनंदवन चौक, वरोरा  तर्फे तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर चौक ते शिवाजी चौक पर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले  यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषांनी वरोरा नगरी दुमदुमतली. तसेच आरोग्य शिबीराचे आयोजन करीत भव्य रक्तदान शिबीरही घेण्यात आले. यात अनेक शिवभक्त व नागरिकांनी सहभाग घेतला. जयंती महोत्सवात वरोरा नगरी दुमदुमली. सेवा गृपचे कार्य प्रशंसनिय असल्याचे डॉ. आगलावे यांनी सांगितले.
      या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व व्याख्यानकार रविदादा मानव अध्यक्ष गुरूकुल मोझरी ,किसानपुत्र नरेंद्र जीवतोडे, ग्रामगीताचार्य प्रा.कावळे सर, भाउऊराव वैद्य गुरूजी, बघेल ठेकेदार, टिपले सर, रमेश राजुरकर , सेवागुपचे  निखिल मांडवकर, तसेच सेवा गुुपचे सदस्य, पदाधिकारी व अनेक शिवभक्त व नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत