महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत इतर संवर्गातील लाभार्थ्यांना वैयक्तिक कामासाठी देण्यात आलेली २.०० हे. आर.ची अट शिथिल करा #pombhurna

माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांची आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
पोंभुर्णा:- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत इतर संवर्गातील लाभार्थ्यांना वैयक्तिक कामासाठी देण्यात आलेली २.०० हे. आर.ची अट शिथिल करण्यात यावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य मा.राहुल संतोषवार यांनी माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा विद्यमान विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
महाराष्ट्र शासन नियोजन विभाग ,शासन निर्णय क्र. म.ग्रा. रो.-२०११/प्र. क्र.४६/मग्रारो-१०अ, दिनांक २ मे २०११ च्या अनुषंगाने दारिद्रय रेषेखालील भू-सुधार योजनेचे लाभार्थी व कृषी कर्जमाफी योजना ,२००८ नुसार लहान व सिमांत शेतकऱ्यांना म. ग्रा. रो. ग्रामीण ची देण्यात आलेली अट शिथिल करावी. शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये २.०० हे.आर.वरील मजगी कामे अडचण निर्माण होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची ही अट शिथिल करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत