Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

पोंभुर्णा तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरजू कुटुंबाना घरकुल योजनेचा लाभ मिळावा #pombhurna

माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांची आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरजू कुटुंबाना घरकुल योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य मा.राहुल संतोषवार यांनी माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा विद्यमान विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
कुडा-मातीचे घर असलेल्या विकलांग, अत्याचार, पीडित, विधवा, घटस्फोटित, अल्पभूधारक कुटुंबाना ग्रामसभांनी घरकुल संबंधी प्रपत्र ड यादी मंजूर केले असतांना सुद्धा काही लाभार्थ्याची नावे अंतिम यादीमधून वगळण्यात आलेली आहे. तरी ती नावे प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत