बोर्डा बोरकर हे गाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेमध्ये समाविष्ट करा pombhurna

Bhairav Diwase
माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांची आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
पोंभुर्णा:- बोर्डा बोरकर हे गाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य मा.राहुल संतोषवार यांनी माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा विद्यमान विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. बोर्डा बोरकर गावाची लोकसंख्या ६८७ असून सदर गाव जंगलालगत आहे.वन व्यवस्थापन समिती नागरिकांना या योजनेचा लाभ मिळन्याकरिता जन वन विकास योजनेमध्ये गाव समाविष्ट करावे.
तसेच बोर्डा बोरकर येथील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 42 -ड नुसार मानीव अकृषक जमीन कृषक मध्ये रूपांतर करण्याची विनंती केली. येथील कुटुंबाचे 25 ते 30 वर्षांच्या आधीपासूनच ते तेथील कायमचे रहिवाशी आहेत. परंतु तलाठी साझा क्र.५ यांनी अकृषक चे नोटीस प्राप्त झाले असल्याने ती जागा कृषक मध्ये करण्याची विनंती करण्यात आली.