Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

कळमगाव (गन्ना) येथिल बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे सिंदेवाहीत विलनिकरन थांबवा #sindewahi


ग्रामस्थांची व समस्त खातेदारांची मागणी

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील गाव कळमगाव (गन्ना)येथील शाखा बँक ऑफ महाराष्ट्र ही सिंदेवाहिला स्थलांतरित होऊ नये... करिता गावकऱ्यांनी व शेजारील गावच्या शेतकरी, खातेधारकांनी धरणे आंदोलन केले आहे. धरणे आंदोलन हे दिनांक २४ मार्चला २०२२ ला दूपारला १२ वाजता सुरू करण्यात आले असून शाखा व्यवस्थापक यांना ही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. निवेदनात स्पष्ट नमूद आहे की १ एप्रिल २०२२ पासून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमगाव(गन्ना)ही शाखा विलनिकरण होण्याकरिता नोटीस लागलेले आहेत.त्या नोटीसची दखल घेत गावकऱ्यानी व शेजारील गावातील शेतकरी ग्राहकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
त्याचप्रमाणे आंदोलनकर्त्यांच म्हणणे असे आहे की जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही.तोपर्यंत शांततेत आंदोलन सुरू ठेवण्याचा दृढ निश्चय आम्ही केला आहे. कळमगाव येथिल बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत आजूबाजूच्या गावातील खातेदार आहेत.त्यामुळे स्थलांतर झाल्याने खातेदारांना समस्या उद्भवणार,आर्थिक व्यवहारासाठी तालुक्याच्या ठिकाणी बँकेत जाणे हे निश्चितपणे अडचणीचं होणार आहे.खातेदारांचा वेळ वाया जाईल ह्या समस्यांचा विचार करूनच हे आंदोलन करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी व खातेधारकांनी केला.तेंव्हा प्रशासन यांच्या आंदोलनाची केव्हा दखल घेऊन सुधारीत सूचना पत्र काढणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आंदोलनात सहभागी बाबूराव जी गेडाम,माजी सभापती प.स.सिंदेवाही,मालता दिलीप अगडे सरपंच, ग्रा.प.कळमगाव,रामचंद्र श्रीरामे, सरपंच,कुकडहेडी,सुषमा धारने सरपंच कलमगाव(तु)सीमा नन्नावरे,सरपंच,मोहाली(नले)अविनाश ननावरे,उपसरपंच कलमगाव(गन्ना),मगरे उपसरपंच कलमगाव(तुकुम)तोरणकर मॅडम उपसरपंच कुकडहेडी,प्रफुल अगडे.ग्रा.प.सदस्य,कलमगाव(तु)कोमल गेडाम,सुधाकर घरत,हरिदास गेडाम,आकाश श्रीरामे,गणेश चौधरी,विकास मेश्राम,सखी महिला ग्रामसंघ कलमगाव(गन्ना) तसेच समस्त गावकरी व खातेदार सहभागी आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत