Top News

महाराष्ट्राचा सर्व समावेशक विकास साधणारा अर्थसंकल्प:- आ. किशोर जोरगेवार #chandrapur

क्रीडा, सांस्कृतीक, धार्मीक, शैक्षणीक, आरोग्य, पर्यावरण, पायाभुत सुविधा, शेतकरीवर्ग, गोर - गरिब, कायदा सुव्यवस्था, लघु उद्योग, कामगार, तृतीयपंथी, या सर्व घटकांना केंद्रस्थानी ठेवत मोठ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामूळे आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ख-र्या अर्थाने महाराष्ट्राचा सर्व समावेशक विकास साधणारा असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अधिवेशनात राज्याचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील वढा तिर्थ क्षेत्राच्या पर्यटनदृष्टा विकासासाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. तसेच चंद्रपूर येथील वन विभागाच्या 171 हेक्टर जागेवर व्याघ्र सफारी करिता पाच वर्षात 286 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे हमखास वाघाच्या दर्शनासाठी जग प्रसिध्द असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाला आणखी चालना मिळणार असून याचा मोठा फायदा रोजगार निर्मीत्तीसाठी होणार आहे.
झोपडपट्टी सुधारणा धोरण राबविण्याची घोषणाही सदर अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याचाही फायदा निश्चीतपणे चंद्रपूर जिल्ह्यातील झोपडपट्टी धारकांना होणार आहे. कोरोनामूळे घरातील कर्ता गेलेल्या महिलांना स्वयंरोजगारासाठी शुन्यदर व्याजावर कर्ज उपलब्ध करुन देण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
५ हजार गॅस स्टेशन सुरु करणार असल्यामुळे गॅस सिलेंडरचेही दर कमी होणार आहे. कौशल्य रोजगार विकासाठी ६१५ कोटी रुपये, शालेय शिक्षणासाठी २,३५३ कोटी रुपये, क्रीडा शेत्रासाठी ३८५ कोटी रुपये अश्या अनेक घोषणा करण्यात आल्या आहे. एकंदरित विचार केला असता या अर्थसंकल्पात चंद्रपूरातील धार्मीक आणि पर्यटनासाठी मोठ्या निधीची तरतुद करण्यात आली असून सर्व घटकांना केंद्रस्थानी ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने