Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo



 

अखेर माथाडी येथिल ठिय्या आंदोलनाला यश #Jivati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील माथाडी येथिल जि.प.प्राथमिक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर गावातील व्यकतीचे नाव असल्याने हे नाव काढण्यात यावा करिता मा.रमेश आडे दगडु श्रीरामे व माधव सागरे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर जो पर्यंत मुख्य प्रवेशद्वारावरचे नाव काढुन आमची मागणी पुर्ण करणार नाही तो पर्यंत शाळा समोर ठिय्या आंदोलन करणार असल्याने शाळा व्यवस्थापन समितीची तातडीने बैठक घेऊन सर्वानुमत्ते शाळेसमोरील भेट स्वरुपात देण्यात आलेले मुख्य प्रवेशद्वार काडुन नविन प्रवेशद्वार ग्रामपंचायत कार्यालय मरकागोंदी यांच्या कडुन लावण्यात येईल असे शालेय समितीकडुन लेखी निवेदन देउन आदोलन कर्यांची मागणी पुर्ण केली व आदोलक रमेश आडे दगडु श्रीरामे माधव सागरे यांनी निवेदन स्विकारुन आदोलन मागे घेतले या वेळी अशोक आडे सुरेश सागरे संतोष आडे प्रमेश्वर श्रीरामे शालेय व्यवस्थापन समितीचे कर्मचारी ग्रामपंचायत सचिव व महिला यांची मोठी संख्या होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत