Top News

शिवसेनेच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी #pombhurna

ढोल ताश्याच्या गजरात दुमदुमली पोंभूर्णा नगरी

शिवप्रेमींचा उत्स्फूर्थ प्रतिसाद
पोंभुर्णा:- शिवसेना पोंभूर्णा शहरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. शहरातून मोठ्या उत्साहात भव्य शोभयात्रा काढण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार व शहर प्रमुख गणेश वासलवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिमेचे पुष्पमाला अर्पण सामजिक कार्यकर्ते शामकांत गेडाम,सद्गुरू ढोले,अविनाश वाडके,नगरसेवक अभिषेक बद्दलवार,बालाजी मेश्राम अतुल वाकडे,नदकिशोर बुरांडे,सौ.रामेश्वरी वासलवार,कांताबाई मेश्राम व आदी मान्यवरांच्या उपस्थीत करण्यात आले.

शहरातील मुख्य चौकातून ढोल ताश्या गजरात व डिजे धुमालच्या तालावर हजारो युवक,महिलांनी थिरकले फटाक्यांची आतषबाजी व पारंपरिक ढोल छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर स्वार होत,रोषणाईच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
याप्रसंगी डॉ.अमोल बावणे,किशोर गुज्जनवार,महेश श्रीगिरिवार,अमोल कावटवार संपत सातपुते,अशोक बोलीवार,आशिष कावळे,नंदू ईप्पलवार,भावीका मडावी,ललीता कोवे,सोनी मानकर,रोशनी देवताळे,रेखा निमगडे,मेघा मानकर,अर्चना कोसरे,रंजना कोटरंगे,ताईबाई शेडमाके,अनिता मेश्राम,शारदा नैताम,अन्कुश गव्हारे,राकेश मोगरकर सागर काबरे मनिष कोपावार,अक्षय सोनूले,प्रविण सातपुते,प्रफुल गव्हारे,साहिल नैताम भुषण ईप्पलवार प्रशांत गोंगले,देवा मानकर,विकास गुरुनूले,राजेश मादाळे,नितीन कोडापे,आरती राऊत वर्षा गद्देकार,करीना दुधलकर,अश्विनी गद्देकार,प्रणाली मेश्राम,साक्षी कुडमेथे, अश्विनी मेश्राम व आदी युवक,युवती,महिला व शिवसैनिक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने