Top News

युवा तत्काल सेवा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने केकेझरी येथिल महिलाना विवीध साहित्य किटचे वाटप #Jivati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- आजच्या धावपळीच्या युगात महिलांचे आरोग्यकडे दुर्लक्ष करत असल्याने महिलांचे आरोग्य धोक्यात आले असून महिलांनी आपल्या आरोग्याची योग्य अशी काळजी घेत नसल्याने त्यांना अनेक रोगंचा समना करावा लागतो आहे.अशातच महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी. आणि रोगमुक्त कसे व्ह्यावे निरोगी जिवन कसे जगावे आरोग्य ही धनसंपदा असून मानव निरोगी असेल तरच जीवनाला महत्व प्राप्त होईल आपल्याकडे कितीही पैसा असेल आणि आपले आरोग्य हे निरोगी नसेल तर तरच जीवनाला महत्व प्राप्त नाही.आरोग्य धनसंपदा या विषयावर युवा तात्काळ सेवा या संस्थेमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित दयानंद देविदास राठोड अध्यक्ष युवा तत्काळ सेवा बहुद्देशीय संस्था,ग्रामपंचायत चे सचिव मोहर्ले ,समुदाय आरोग्य अधिकारी शितल चिकटे, दयानंद गोरे, गोविंद कांबळे, मुकेश चव्हाण,अंबादास पवार व गावातील महिला, किशोरवयीन मुली यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने