भाजपा महिला आघाडी महानगर जिल्हाध्यक्षा अंजली घोटेकर यांची निवेदनाद्वारे मागणी
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील शितल मेहता या तरूणीच्या संशयास्पद मृत्युची सखोल चौकशी करण्यात यावी व चौकशीच्या निष्कर्षाच्या अनुषंगाने दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपा महिला आघाडी महानगर जिल्हाध्यक्षा सौ. अंजली घोटेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
भाजपा महिला आघाडी महानगर जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर यांच्या नेतृत्वात दि. २२ मार्चला जिल्हा पोलिस अधिक्षक यांना शितल मेहता हिच्या संशयास्पद मृत्युचा तपास गंभीरतेने व योग्य रितीने सखोल चौकशी करण्यात यावी, याकरिता भारतीय जनता महिला आघाडी महानगर तर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी महामंत्री रविंद्र गुरनुले, भाजपा महामंत्री शिला चव्हाण, नगरसेविका शितल गुरनुले, नगरसेविका माया उईके, पुष्पा उराडे, महिला मोर्चाच्या सिंधु राजगुरे, मोनिषा महातव, प्रभा गुडधे, मृतक मुलीचा भाऊ तसेच मृतक मुलींची मैत्रीन शुभांगी ही प्रामुख्याने उपस्थित होती.