Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

द काश्मिर फाईल हा चित्रपट संपूर्ण महाराष्‍ट्रात करमुक्‍त करावा:- विशाल निंबाळकर #chandrapur

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- जम्‍मू काश्मिरमध्‍ये दहशतवादाला बळी पडलेल्‍या काश्मिरी पंडितांवरील अन्‍यायावर भाष्‍य करणारा द काश्मिर फाईल हा चित्रपट नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्‍या अत्‍याचाराची वास्‍तविकता या चित्रपटातून मांडण्‍यात आली आहे. अधिकाधिक नागरिकांना चित्रपट पाहाता यावा, यासाठी तो करमुक्‍त करावा अशी मागणी भाजयुमो चंद्रपूर महानगर अध्‍यक्ष विशाल निंबाळकर यांनी केली.
दि. १६ मार्च २०२२ रोजी द काश्मिर फाईल हा चित्रपट भाजयुमो चंद्रपूर महानगर पदाधिका-यांनी करमुक्‍त करण्‍यासाठी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्‍कृतिक सभागृह व मिराज चित्रपट गृहासमोर निदर्शन केले. यावेळी चंद्रपूर महानगर भाजपचे महामंत्री ब्रिजभुषण पाझारे, चंद्रपूर महानगरचे भाजयुमो अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, भाजयुमो महामंत्री प्रज्‍वलंत कडू, यश बांगडे, मनोज पोतराजे, राहुल पाल, रुपेश चहारे, श्रीकांत येलपुलवार, राजेश यादव, आकाश मस्‍के, अ‍भी वांढरे, आशिष ताजणे, मयुर चहारे, रोशन माणुसमारे, आकाश ठुसे, प्रविण उरकुडे, सतिश तायडे, मनिष पिपरे, महेश कोलावार, मधु श्रीवास्‍तव, प्रविण चुनारकर, देवेंद्र बेले, बंडू गौरकार, योगेश चौधरी, वासुदेव बेले, रोहन चालेकर, अखिलेश रोहीदास आदिंची उपस्थिती होती.
निदर्शन करते वेळी “जहॉ हुए बलिदान मुखर्जी वह कश्मिर हमारा है”, “जहॉ हुआ तिरंगेका अपमान वही करेंगे उसका सन्‍मान” अशा अनेक घोषणा देत निदर्शने करण्‍यात आली. निदर्शने झाल्‍यानंतर सर्व कार्यकर्त्‍यांनी मिराज चित्रपटगृहात द काश्मिर फाईल हा चित्रपट बघितला. यावेळी चित्रपटगृह तुडूंब भरलेला होता. हा चित्रपट विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्‍दर्शीत असून जम्‍मु आणि काश्मिर मधील १९८९-९० दरम्‍यान पिडित काश्मिरी पंडितांच्‍या पलायनाचे चित्रण दाखवल्‍या गेले आहे. हा चित्रपट सर्वांनी चित्रपटगृहामध्‍ये जाऊनच बघावा असे आवाहन भाजयुमो अध्‍यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत