Top News

अखेर त्या अडीच वर्षापासून भूमिगत आरोपींना पकडण्यात वन विभागाला यश #Rajura

चितळ शिकार प्रकरण; राजुरा वनपरिक्षेत्राची कामगिरी
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 23 /8 /2019 रोजी सिंधी गावात चितळाचे मास विल्हेवाट लावत असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना लागली. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता वनविभागाचे अधिकारी येण्याचा सुगावा लागताच बापूजी सिताराम कोडापे यांचे घरी धाड टाकली असता घटनास्थळावरून बापूजी सिताराम कोडापे, साईनाथ बापूजी कोडापे,व संजय मारोती कोडापे हे सर्व राहणार सिंधी आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.
वनाधिकार्‍यांनी घटनास्थळावरून चितळाचे मास, चितळाचे अवयव व इतर साहित्य जप्त करून अपराध क्रमांक 227 /16 दिनांक 23/ 8/ 2019 अन्वये वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2,9,39,50 व 51नुसार
वन गुन्हा जारी केला.
त्यानंतर दिनांक 24/8/2019 रोजी सदर आरोपींच्या शोधात सिंधी येथे आरोपीच्या राहते घरी धाड टाकली असता, वनगुन्ह्यातील आरोपी बापूजी सिताराम कोडापे यास ताब्यात घेण्यात आले व अटक करून राजुरा न्यायालयात हजर करून (E.C.R) वन कोठडी घेण्यात आली.
सदर वनगुन्ह्यातील दोन वर्षे आठ महिने पासून फरार असलेले आरोपी साईनाथ बापूजी कोडापे वय 39 वर्ष, संजय मारोती कोडापे वय हे दोन्ही आरोपी रा. सिंधी यांना दिनांक 21/3/2022 रोजी सकाळी पहाटेच्या सुमारास सिंधी गावात धाड टाकून त्यांचे राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले.
सदरची कारवाई उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय वनाधिकारी अमोल गर्कल राजुरा, वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट क्षेत्र सहाय्यक विहिरगाव एन. के. देशकर, क्षेत्र सहाय्यक राजुरा पि.आर. मते, वनरक्षक सुलभा उरकुडे, सुनील मेश्राम, संजय सुरवसे, यांनी केली. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने