Top News

वायू प्रदुषण करणारे सिएसटीपीएसचे ३ आणि ४ क्रमांकाचे संच बंद करा:- आ. किशोर जोरगेवार #chandrapur

अधिवेशात केली मागणी
चंद्रपूर:- चंद्रपूरातील सिएसटीपीएस येथील ३ आणि ४ क्रमांकाचा संच जुना असल्याने यातून मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. त्यामुळे हे संच बंद करण्यात यावे तसेच चंद्रपूरातील प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्याकरिता उपाययोजना करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी मुंबई अधिवशेनात लक्षवेधीवर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
📸 चंद्रपूर जिल्ह्यातील महाऔष्णिक वीज केंद्राच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा परिणाम केंद्राच्या चंद्रपूरसह थेट नागपूर, पुणे व मुंबईवर होत असल्याचा दावा पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या द सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अण्ड क्लिन एअर ( सीआरईए ) नामक संस्थेने केला आहे. सदर महाऔष्णिक वीज केंद्रातून निघणारे एस.पी.एम., सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि मर्क्युरी सारखे प्रदुषणकारी घटक हवेच्या माध्यमातून या शहरांपर्यंत पोहचत आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा दावाही सदर संस्थेने आपल्या सर्वेक्षणात केला आहे. वायू प्रदूषणामुळे २०२० मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ८५, नागपूर ६२, यवतमाळ ४५, मुंबईत ३० आणि पुणे व नांदेड मध्ये प्रत्येकी २९ जणांचा अकाली मृत्यू झाल्याचेही या संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या गंभिर विषयावर आज चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. 📸

यावेळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर शहर हे पाच लक्ष लोकवस्तीचे शहर आहे. त्यामुळे या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून महाऔष्णिक वीज केंद्राचे मुदतबाह्य झालेले ३ आणि ४ क्रमांकाचे संच बंद करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
📸
तसचे येथे हवा शुध्दीकरण संयंत्र लावण्यासह या विज केंद्राच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदुषणावर इतर उपाय योजनांच्या माध्यमातून नियंत्रण मिळविण्याकरिता उपाय योजना करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे. यावर उत्तर देतांना सदर विषया संदर्भात संबधित विभागाची लवकरच बैठक लावणार असल्याचे पर्यावरण राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने