माजी सभापती सुनील उरकुडे व स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून धोपटाळा कॉलनी येथे व्हाॅलीबॉल स्पर्धा आयोजित #Rajura

Bhairav Diwase
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा  
राजुरा:- धोपटाळा स्पोर्टिंग क्लब चे पदाधिकारी व भाजप कार्यकर्त्यांनी सभापती सुनील उरकुडे यांची भेट घेऊन व्हॉलीबॉल प्रतियोगीतेची कल्पना बोलून दाखविली, नेहमी प्रमाणे चांगल्या कामासाठी सकारात्मक दृष्टीने निर्णय घेणारे माजी सभापती सुनील उरकुडे यांनी सहकार्यासाठी होकार देत आज त्या प्रतियोगीतेच आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उद्घाटन म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार संजय धोटे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाचा आनंद लुटला.

सदर प्रसंगी राजू घरोटे, विनोद बारसींगे, जुपकाजी, सचिन डोहे, सचिन शेंडे, श्रीनिवास कोपुला, कृष्णा अवतार, स्वप्नील राजूरकर, दिनेश वैरागडे, प्रमोद आवते, जावेद भाई, स्वप्नील सोयाम, प्रणय राजूरकर, आदित्य राहते, शुभम वैरागडे, बंटी यदी मान्यवर उपस्थित होते.