Top News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू #tiger #tigerattack #death

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- आमराई नदीच्या घाटावर बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. त्याच्या शरीराचे लचके तोडत शेतात नेऊन सोडले. मृत शेतकऱ्याचे नाव कवडू किसन मेश्राम (वय ५५, रा. बोडधा) असे आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) उघडकीस आली.बोडधा येथे रविवारी विवाहसोहळा होता. त्यासाठी कवडू किसन मेश्रामही गेले होते. लग्न आटोपून ते घरी परतले. त्यानंतर दुपारी बैल घेऊन ते अमराई नदीघाटावर गेले. सायंकाळी बैल घरी परत आले; मात्र कवडू मेश्राम हे रात्र होऊनही घरी परत आले नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी अमराई घाटावर शोधाशोध केली. मात्र, त्यांचा काहीच पत्ता लागला नाही.
सोमवारी पुन्हा गावकऱ्यांनी वैनगंगा नदीकाठावर शोधमोहीम सुरू केली. तेव्हा वैनगंगा नदीघाटाला लागून असलेल्या बंडू पाटील ठाकरे यांच्या शेतात मेश्राम यांचा मृतदेह आढळला. दरम्यान, या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.
वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राह्मणे, ठाणेदार रोशन यादव, बोडधा येथील सरपंच मनीषा झोडगे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष धनराज पाटील ठाकरे, मेंडकी पोलिस चौकीचे प्रकाश कावळे दाखल झाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने