Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

त्याला पाहताच विषारी सापाने काढला फणा #snake #snakenews


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
आरमोरी:- रात्री तुम्ही लघुशंकेला गेला आणि अचानक तुम्हाला समोर भलामोठा नाग दिसला तर.. असाच काहीसा थरारक अनुभव आरमोरीतील एका व्यक्तीला आला. त्यांनी लगेच सर्पमित्राला बोलविल्याने होणारा अनर्थ टळला.
विठ्ठल वॉर्डातील संतोष कर्णेवार यांच्या घरी शुक्रवारी रात्री १.३० च्या सुमारास ही घटना घडली. घरची मंडळी सर्व कामे आटोपून जेवणानंतर झोपी गेले. दरम्यान, रात्री दीड वाजताच्या सुमारास संतोष लघुशंकेसाठी झोपेतून उठून बाथरूममध्ये गेले असता त्यांच्यासमोर भला मोठा ५ फूट लांबीचा विषारी नाग साप फणा काढून उभा होता. साप दिसताच घाबरून त्यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकताच गाढ झोपेत असलेल्या कर्णेवार कुटुंबीयांची झोप उडाली.
वॉर्डातील नागरिक जागे झाले लगेच त्यांनी आरमोरीतील वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य सोनू सातव, आशू चन्ने यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता परिस्थिती पाहून सोनू सातव, आशू चन्ने घटनास्थळी पोहोचून त्या सापाला सुरक्षित पकडण्यात यश मिळविले. साप पकडल्यानंतर कर्णेवार कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत