वसुलीची ऑडिओ रेकाडिंग सोशल मीडियावर तुफान व्हायरल
आधार न्युज नेटवर्क या व्हायरल ऑडीओ क्लिपची पुष्टी करत नाही.
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात एक ऑडिओ रेकाडिंग तुफान व्हायरल होत आहे. एका राजकीय पदाधिकाऱ्यांनी जागतिक महीला मेळावा कार्यक्रम घेण्यासाठी वरिष्ठांचे फर्मान म्हणून एका राष्ट्रीय पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षांनी रेती माफिया, अवैध दारू विक्रेते, तालुक्याचे तहसिलदार, ठाणेदार, गट विकास अधिकारी यांच्याकडून चक्क वसूली केली! हे कितपत योग्य असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.
आता राष्ट्रीय पक्षाच्या एका महिला तालुकाध्यक्षांनी महिला मेळावा कार्यक्रमासाठी अंदजे १ लाख रुपयांचा खर्च लागणार असल्याने "त्या" महिलेने रेती माफियांना फोनवरून दहा हजाराची मागणी केल्याचे समोर आले आहे. मविआ सरकारमधील आमदार साहेबांचा आदेश आहे. म्हणूनच मि रेती माफिया, अवैध दारू विक्रेते, तालुक्याचे तहसिलदार, ठाणेदार, गट विकास अधिकारी यांच्या कडून वसूली करत आहे. या सर्व संभाषणाची आडियो क्लिप व्हायरल झाली आहे. सदर ऑडिओ क्लिप ही सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलीच व्हायरल होत आहे.
सदर सोशल मीडियावर व्हायरल झालेली ऑडीओ क्लिपमध्ये वसूली हि आमदाराच्या आदेशाने होत असल्याची कबूली या संभाषणात ऐकायला मिळेल.
सदरच्या व्हायरल ऑडिओ क्लिप ची सत्यता जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वाने तपासायला हवी, सध्या समाजमाध्यमात ती क्लिप व्हायरल झाली आहे, सदर बातमी त्या व्हायरल क्लिप च्या आधारे बनविण्यात आली आहे.
आधार न्युज नेटवर्क या व्हायरल ऑडीओ क्लिपची पुष्टी करत नाही.