Top News

श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
राजुरा:- श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 05 एप्रिल 2022 रोज मंगळवारला सकाळी ठीक १०:०० वाजता आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात येत असून या चर्चासत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गाडे अभ्यासक, भारत - चीन संबंधावर अभ्यास असणारे डॉ. अरविंद येलेरी, सहयोगी प्राध्यापक, पेकींग विद्यापीठ, बीजिंग ( चीन ) तसेच  भारत - रशिया संबंधावर ज्यांचे संशोधन आणि महत्त्वपूर्ण असा अभ्यास असणारे डॉ. लेनीन कुमार, सहाय्यक प्राध्यापक,  MIT School of Pune हे उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्रात बड्या राष्ट्रांचा विस्तारवाद आणि वैश्विक संघटनांची कार्यप्रणाली या विषयावर विचारमंथन होणार आहे. 


सध्याच्या परिस्थितीत हा विषय अतिशय महत्वाचा असून संपूर्ण जागतिक परिप्रेक्षात चालू असलेल्या घडामोडींवर भाष्य होणे गरजेचे आहे, म्हणूनच हा विषय चर्चासत्रात निवडण्यात आलेला आहे, तरी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील तसेच भारताबाहेरील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी तसेच सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी वारकड तसेच या चर्चासत्राचे आयोजक डॉ. राजेंद्र सदाशिव मुद्दमवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने