Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

चंद्रपूरजवळ कार अपघातात २ ठार, ६ जखमी.



(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात 
चंद्रपूर:- चंद्रपूर शहराजवळ चिचपल्ली येथे कार अपघात झाला आहे. या अपघातात २ जण जागीच झार झाले. तर ६ जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. कारपुढे अचानक जनावर आडवे आल्यामुळे हा अपघात जाला आहे.
चंद्रपुरात मोठ्या भावाच्या तेरवीचा कार्यक्रम आटोपून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे पारखी कुटुंब परत जात होते. यावेळी भरधाव वेगातील कारपुढे जनावर आडवे आल्याने चालकाचे संतुलन बिघडले. यावेळी कार खाली कोसळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात पोलीस कर्मचारी असलेल्या अनिल पारखी यांची पत्नी व आईचा या अपघातात मृत्यू झाला. किरण पारखी ३२ आणि शोभा पारखी ६० अशी मृतांची नावे आहेत. कार पुलाखाली कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून रामनगर पोलीस (Police) पुढील अधिक तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत