मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांचा तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा #chandrapur #mul

Bhairav Diwase
0

मूल:- गेल्या अनेक वर्षापासुन तालुक्यात शिवसेनेचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थेवर लहरविण्यासाठी मेहनत घेतलेले शिवसेनेचे मूल तालुका प्रमुख नितीन येरोजवार काही दिवसात शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याची विश्वसनिय वृत्त होते .आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा चंद्रपूर जिल्हासंपर्क प्रमुख प्रशांत कदम तथा जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्याकडे पाठवीला.
राज्यात महाविकास आघाडीच्या रूपाने शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेनेचे सर्वेसर्वे नामदार उध्दव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनात राज्यात शिवसेना वाढत आहे, परंतु जिल्हयातील अंतर्गत राजकारणामुळे अनेकांना त्यांचा फटका बसताना दिसत आहे, मूल तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासुन नितीन येरेाजवार हे तालुका प्रमुख म्हणुन पदभार स्विकारून स्वखर्चाने तालुक्यातील दोन ग्राम पंचायतवर सरपंच, तीन ग्राम पंचायत मध्ये उपसरपंच तर तब्बल 26 ग्राम पंचायत सदस्य निवडुण आणण्यामध्ये त्यांनी मोलाची भुमिका बजावली आहे.
शिवसेना या पक्षावर नितीन येरोजवार यांची भरपुर निष्ठा आहे .मुल तालुक्यातील कोणत्याही अधिकारी,व्यावसायिक, कंत्राटदार यांना कधीही कोणताही त्रास दिला नाही त्यांची ही इमानदार छबी ही सर्वाचे मन जिंकून घेणारी आहे.
तसेच जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांचे अत्यंत विश्वासु म्हणुन सर्व चंद्रपूर जिल्हात ओळखले जातात त्यांनी सोपविलेले प्रत्येक काम त्यांनी पुर्ण केलेली आहे, त्यांनी पक्षासमोर कधीही पैसा, वेळ यांचा विचार केलेला नाही, तालुका प्रमुखाची जबाबदारी येताच त्यांनी मूल शहरातील प्रत्येक वार्डात तसेच मुल तालुक्यातील जिल्हापरीषद व पंचायत समिती गणामध्ये शाखा गठीत केलेली आहे, काम करीत असताना कार्यकर्त्यांना त्रास होवु नये यासाठी त्यांनी हजारो रूपये खर्च करून बस स्थानकाच्या समोर भव्य असे कार्यालय उभारलेले आहे. यासाठी त्यांनी स्वतःजवळील लाखो रूपये केवळ पक्षासाठी खर्च करीत आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून राजकारण तसेच व्यवसायाच्या व्यापामुळे पत्नीच्या तब्येतीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे शस्त्रक्रीया करण्यात आली.
तसेच शिवसेना पक्षाच्या एक पदाधिकारी मुल येथे गटबाजी कशी होईल आणि सर्व मुल तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी यांच्यात कशी फुट कशी पाडली जाईल याच नियोजन करीत शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांच खच्चीकरण करण्याचे काम करीत होता ही बाब अनेकदा जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्या लक्षात आली परंतु कामाच्या व्यापाने त्यानी पण या बाबीकडे दुर्लक्ष केले.नेहमी होणाया अपमानामुळे त्यांनी शिवसेना तालुकाप्रमुख पदाला जय महाराष्ट्र केले असल्याची माहिती आहे.
नितीन येरोजवार यांनी फक्त शिवसेना तालुकाप्रमुख राजीनामा देत आहो असे आपल्या मुलाखतीत म्हटले तसेच अखेरच्या श्वासापर्यंत हिन्दुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक राहणार असे बोलताना म्हटले आहे . या राजीनाम्याने तालुक्यातच नाही तर जिल्हात शिवसेनेला मोठा झटका बसला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)