Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

तानाजीभाऊ जाधव यांना यंदाचा नेल्सन मंडेला नोबल शांती पुरस्कार प्रदान.



मुंबई:-
   विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्टीत व मनाचा समजला जाणारा नेल्सन मंडेला नोबेल शांती पुरस्काराचे वितरण मुंबई येथील हॉटेल सहारा स्टार येथे संपन्न झाले.
यावेळी टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पै.डॉ. तानाजीभाऊ जाधव यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 'नेल्सन मंडेला नोबेल शांती पुरस्कार 2022' ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण संयुक्त अरब अमिरात येथील शेख माजिद बिन रशीद अल मौला (शासक- उम अल कुवेन) व छत्रपती श्री संभाजी राजे भोसले (राज्य सभा सदस्य) यांच्या हस्ते करण्यात आले. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू डॉ प्रल्हादभाई मोदी, पद्मश्री उज्वल निकम, पद्मविभूषण आशाताई भोसले, पद्मश्री शंकर महादेवन, जया प्रदा, अनुराधा पौडवाल आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
 टायगर ग्रुपच्या वतीने मागील काळात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळात राज्यभर सुमारे 5000 पिशवी पेक्षा अधिक रक्तदान, वृक्षारोपण व संवर्धन, अन्नदान, गोरगरिबांना कपडे वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गोशाळेत चारा वाटप, अपघातग्रस्तांना मदत असे अनेक उपक्रम सुमारे चार राज्यांमध्ये राबविले जातात. याची दखल घेऊन पै डॉ.तानाजीभाऊ जाधव यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी टायगर ग्रुपचे मुंबई अध्यक्ष संजयभाऊ खंडागळे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ जाधव यांचे अभिनंदन केले आहे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्यसरचिटनिस विश्वासराव आरोटे व राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, प्रा. महेश पानसे, संपादक अनुपकुमार भारगव यांनी डॉ जाधव यांना शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत