जाहिरात... Advertisement... विज्ञापन

युवाशक्ती मजबूत लोकशाहीचा आधार:- शिवानी दाणी #chandrapur

भाजयुमोच्या युवा वॉरियर्स शाखेचे उद्घाटन
चंद्रपूर:- भारत विश्वगुरू व्हावा या संकल्पनेतून भाजपाची वाटचाल सुरू आहे.या प्रक्रियेत युवापिढीची महत्वाची भूमिका राहणार आहे.ही भूमिका युवकांनी समजून घ्यावी.ही युवाशक्ती मजबूत लोकशाहीचा आधार आहे,असे प्रतिपादन भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी यांनी केले.त्या गुरुवार 28 एप्रिलला भारतीय जनता युवा मोर्चा, बंगाली कॅम्प मंडळ मधील इंदिरा नगर युवा वॉरियर्स शाखेचं उद्घाटन करतांना बोलत होत्या.

लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या कार्यक्रमात युवा वॉरियर्स विदर्भ संयोजक देवदत्त डेहनकर, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, भाजपा महामंत्री महानगर ब्रिजभूषण पाझारे,भाजयुमो महामंत्री प्रज्वलंत कडू, सुनील डोंगरे, प्रमोद क्षीरसागर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेवटच्या माणसाची सेवा करण्याचा संकल्प करा:- निंबाळकर

युवा म्हणजे वायू,त्याची दिशा योग्य व वेग नियंत्रित असेल तर क्रांती होते.स्वतःवर नियंत्रण ठेवून युवकांनी लक्ष्य गाठले पाहिजे.असे करतांना शेवटच्या माणसाच्या सेवेचा संकल्प करा.असे आवाहन भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले.
कार्यक्रमाचे नेतृत्व बंगाली कॅम्प मंडळ अध्यक्ष संजय पटले व युवा वारियर्स मंडळ संयोजक यश बांगडे यांनी केले. कार्यक्रमाला भाजयुमो महानगर उपाध्यक्ष पप्पू बोपचे, मनोज पोतराजे, आकाश म्हस्के यांनी सहकार्य केले. इंदिरा नगर युवा वॉरियर्स शाखा अध्यक्ष श्रीकांत दडमल, उपाध्यक्ष निलेश चौधरी, सचिव पराग कुत्तरमारे, नगरसेविका चंद्रकला ताई सोयाम, वंदनाताई जांभुळकर, मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, चंदन दादा पाल, मनोरंजन रॉय व असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत