भद्रावती:- प्रशासनामध्ये समोर काम करणारे जसे महत्त्वाचे असतात. त्याहीपेक्षा मागाहून काम करणारे अधिक महत्त्वाचे असतात. प्रशासनात मागे राहून काम करणारे हे असे लोक आहेत की जे बाहेरच्यांना दिसत नाहीत. परंतु त्याची भूमिका महत्त्वाची असल्याने ते प्रशासनाचा कणा असतात. म्हणून त्यांचीही भूमिका समजून घ्यायला पाहिजे. चांगले प्रशासन चालविण्यासाठी अशा मागे असणाऱ्या लोकांनीही आपल्या कार्यात कौशल्य प्राप्त केले पाहिजे असे विचार विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा या शिक्षण संस्थेचे सचिव अमन टेमुर्डे यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील आईक्यूएसी विभागाद्वारे आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात मुख्यअतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. यावेळी मंचावर वाणिज्य विभागप्रमुख डॉ. विजय टोंगे, वरिष्ठ लिपिक सतीश मशारकर होते. पुढे बोलताना टेमुर्डे यांनी सांगितले की, प्रशासनामध्ये सर्वांच्याच भूमिका महत्त्वाच्या असतात. अलिकडच्या बदलत्या या काळात कार्यालयात संगणकांना फार महत्त्व आलेले आहे. त्यामुळे सगळ्यांनी संगणक हाताळणी कौशल्य प्राप्त करून त्यात नैपुण्य प्राप्त केले पाहिजे, असे मांडले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. मोहित सावे, प्रास्तविक कनिष्ठ लिपिक दिलीप भोयर आभार लिपिक दीपक तेलंग यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, कार्यालयातील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत