Click Here...👇👇👇

फणसाच्या केवळ पाच झाडांपासून दरवर्षी तीस हजार रुपयांचे उत्पादन #Chandrapur #Chamorshi

Bhairav Diwase
जैरामपुरातील शेतकऱ्याने फुलविली फळबाग; इतरांसाठी प्रेरणादायी
चामोर्शी:- चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदी किनारी वसलेल्या जैरामपूर येथील शेतकरी संतोष एकनाथ गौरकार यांच्या शेतातील अवघ्या पाच फणसाच्या झाडांपासून दर वर्षी ३० हजार रुपयांचे ते उत्पादन मिळवितात.

त्यांच्या वडिलांनी सर्व प्रथमतः १९८५ला चार झाडांची लागवड केली. पुन्हा मुलाने त्याच शिवारात एका झाडाची लागवड केली. आता या झाडांपासून ३० हजार रुपयांचे उत्पादन होते. फणसाच्या फळाला उन्हाळ्यात बाजारात खूप मागणी असते. सद्या बाजारात ६० रु. किलो याप्रमाणे विक्री चालू आहे. या झाडाला दरवर्षी जानेवारी-फ्रेब्रुवारीत फुले येतात. एप्रिल-मे महिन्यात फणसाचं उत्पादन
अशी घेतली जाते काळजी

झाडाला कोणत्याही कीटकनाशकांचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून खोडाला बुरशी लागू नये, त्यासाठी चुना मारतात. मुळाला तणीस झाकून ठेवले जाते. त्यामुळे झाडाला जास्त प्रमाणात बहर येतो. सेंद्रीय खतांचा वापर करून फणसाचं उत्पादन घेतात.
शेतातील झाडाला लागलेले फणस.

घेतलं जातं. या झाडांपासून वर्षाकाठी १५ किंटल उत्पादन मिळवितात. ते स्वतः गोंडपिपरी, मुधोली तुकूम कोणसरी, आष्टी, बाजारात विक्रीसाठी केली जाते. किंवा व्यापारी लोक त्यांच्या शेतामधून घेऊन बाजारपेठेत विक्रीसाठी नेतात. घरूनही त्यांच्या गावा-खेड्यावर विक्री करतात. संतोष दादा गौरकार यांच्या शेत माऊलीस भेट तरुण युवकांनी प्रेरणा घ्यावी असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे.