जाहिरात... Advertisement... विज्ञापन

१० एप्रिल रोजी मुधोली रिठ येथील 'बुद्ध विहाराचे' होणार लोकार्पण #Chamorshi

उद्घाटक म्हणून राजरत्न आंबेडकर उपस्थित राहणार
चामोर्शी:- बौध्द धम्माच्या प्रचार-प्रसारार्थ बुद्धिस्ट सेमिनरी तथा बुद्ध विहाराची निर्मिती व्हावी हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. याचाच एक भाग म्हणून ग्रंथालयांने सुसज्ज अशा मुधोली रिठ येथील पंचशील बुद्ध विहाराचे लोकार्पण तथा बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना तथा अनावरण दिनांक १० एप्रिल २०२२ रोज रविवारला सकाळी ८:०० वाजता वंदनीय भिक्खू संघ व मा. राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख मिलिंद देवतळे यांनी दिली आहे.
दुसऱ्या सत्रात दुपारी १२:०० वाजता दी. बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष आद.राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन, धम्मदीक्षा कार्यक्रम तथा प्रबोधन कार्यक्रम होईल यावेळी वक्ते म्हणून ॲड. लालसु नागोटी आदिवासी विचारवंत भामरागड, मा. भीमराज पात्रिकर ओबीसी विचारवंत गडचिरोली हे मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाची अध्यक्षता मा. धनराज तावडे साहेब, पुणे हे करणार असून प्रमुख अतिथी म्हणून दी. बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे नागपुर विभागीय अध्यक्ष मा.विजय बनसोड. चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष मा.प्रा. कैलास ढेंगळे, डॉ.रोहिदास दुधे, गडचिरोली, राहुल धुरके साहेब, मुंबई, दिपक देवतळे गट शिक्षणाधिकारी एटापल्ली हे उपस्थित राहणार आहेत.
रात्रौ ७:००वाजता वामनदादा कर्डक कलामंच चंद्रपूर प्रस्तुत आंबेडकरी जलसा- "तूफानातील दिवे" हा कार्यक्रम होईल करिता सदर कार्यक्रमास परिसरातील उपासकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे पंचशील बौध्द समाज तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा - मुधोली रिठ कडून आवाहन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत