जाहिरात... Advertisement... विज्ञापन

शिष्यवृत्ती परीक्षेच्या यशाबद्दल रूपांशु उपरे व प्राची झबाडे यांचा सत्कार #pombhurna

पोंभुर्णा:- दिनांक ८ एप्रिल २०२२ शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पास झालेले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये जि. प. प्राथमिक शाळा उमरी पोतदार येथील रूपांशू उपरे आणि प्राची झबाडे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या विद्यार्थ्यांच्या यशा मांगे संपूर्ण जबादारी हाती घेतलेल्या शिक्षकांना हा श्रेय जातो.
कोरोना सारख्या महाभयंकर परिस्तिथी मध्ये सुध्दा हे शिक्षक त्यांना शिकवत राहले आणि आज हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पास झाले. या शिष्यवृत्ती परीक्षेत पास होत स्वतः सोबत आपल्या आई वडिलांचा नाव या विद्यार्थ्यांनी उंचावलेला आहे. विशेष म्हणजे जेव्हा पासून मा. मुख्याध्यपक कदम सर या शाळेला लाभले तेव्हा पासून बरेच विद्यार्थी घडत आहेत.
यावेळी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याकरिता उपस्थित धनंजय साळवे सर (संवर्ग विकास अधिकारी) सुनिता मरसकोल्हे (सहायक विकास अधिकारी) जोशी सर (पोंभूर्णा पोलीस स्टेशन ठाणेदार) अर्चना माशिरकर (गट शिक्षण अधिकारी) आणि या विद्यार्थ्यांना घडवणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरी पोतदार येथील मुख्याध्यापक मा. कदम सर, गव्हारे सर, टोंगे सर, कावरे सर यांनी शिष्यवृत्ती मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत