Top News

ISRO पथक सिंदेवाही तालुक्यात दाखल chandrapur sindewahi


चंद्रपूर:- अवकाशातून पडलेले अवशेष याची तपासणी करण्याकरिता ISRO टीम चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाली असून सिंदेवाही येथे पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या अवशेषांची त्यांनी पाहणी केली.

2 एप्रिलला रात्री आकाशातून उपग्रहाचे अवशेष चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी कोसळले. सिंदवाही, ब्रम्हपुरी आणि चिमूर तालुक्यात हे अवशेष क्रमाक्रमाने आढळून आले होते. सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावात रिंग कोसळली होती. तर यानंतर पवनपार गावातील जंगलात एक धातूचा गोळा आढळून आला होता. यानंतर अनेक ठिकाणी हे गोळे आढळून आले. हे सर्व अवशेष शासकीय कार्यालयात जमा करण्यात आले. याबाबत जिल्हा प्रशासनाने ISRO या भारतीय अंतराळ शोध संस्थेशी संपर्क करून याची माहिती दिली होती. त्यानंतर ISRO टीम येथे अभ्यास करण्यासाठी दाखल होणार हे स्पष्ट झाले होते.

त्यानुसार आज (दि. ८ एप्रिल) ISRO तज्ज्ञ टीम चंद्रपुरात दाखल झाली. त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये ठेवलेल्या ६ सिलिंडर आणि रिंगची पाहणी केली आहे. तसेच स्थानिक लोकांशी चर्चा केली. त्यानंतर हे सर्व अवशेष अभ्यासासाठी घेऊन जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यानंतर अंतराळात घडलेल्या घटनेबाबत उलगडा होऊ शकणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने