Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

दारू दुकानाच्या परवानगीत मनपाचा संबंध नाही #chandrapur


चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे स्पष्टीकरण
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील दाताळा रोड येथे जगन्नाथ मंदिराजवळ नवीन दारूचे दुकान सुरु करण्यात आले असुन या दुकानाला चंद्रपूर महानगरपालिकेकडून परवानगी दिली गेला असल्याचा अपप्रचार केला जात आहे. वास्तविकतः चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत कोणत्याही व्यक्तीला दारूचे दुकान सुरू करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागामार्फत परवाना दिला जातो. याबाबतीत महानगरपालिकेकडून परवानगीची आवश्यकता नसते.
शहरातील दाताळा रोड येथे जगन्नाथ मंदिराजवळ असलेल्या दारू दुकानाच्या संदर्भात सध्या आंदोलन सुरु असून काही व्यक्तींकडुन या दुकानाला चंद्रपूर महानगरपालिकेकडून परवानगी दिली गेला असल्याचा अपप्रचार केला जात आहे. यामुळे संभ्रम निर्माण होऊन दुकानाला परवानगी देताना महानगरपालिकेवर आरोप केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये महानगरपालिकेविरुद्ध विशेष संभ्रम निर्माण होत आहे. अश्या स्वरूपाच्या परवानगीत मनपाला विचारणा केली जात नाही तसेच अश्या स्वरूपाची परवानगी दिल्याची कल्पनाही मनपाला दिली जात नाही.
त्यामुळे दारू दुकानांच्या परवानगी संदर्भातील विषयात संबंध नसतांना मनपाचे नाव घेऊन नागरीकांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण केल्याचे प्रयत्न केल्या जात असल्याने संदर्भातील विषयात कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण महानगरपालिका प्रशासनामार्फत देण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत