चामोर्शी:- घरगुती वादातून पतीने लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार करुन पत्नीचा खून केल्याची घटना आज चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे घडली.
विद्या देविदास चौथाले (वय-२४) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पती देविदास पुंजाराम चौथाले (वय ३०) यास अटक करण्यात आली हाेती.
आष्टी येथील देविदास चौथाले याचा दोन वर्षांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील विद्या नरोटे हिच्याशी आंतरजातीय विवाह झाला होता. लग्नानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले. दरम्यान, आज सकाळी पुन्हा वाद झाला. देविदासने विद्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला. तिचा जागीच मृत्यू झाला.
देविदास स्वत:हून पोलिसांसमाेर हजर झाला. पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश जंगले तपास करीत आहेत.