Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

जिल्हा परिषद कर्मचारी स्पर्धेत भद्रावती तालुक्याचे यश #chandrapur

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा स्तरीय जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेत भद्रावती तालुक्याने यश प्राप्त केले.
डॉ.मिताली शेठी ,मुख्य कार्यपालन अधिकारी, जि.प.चंद्रपुर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनात जिल्हा परिषद कर्मचारी यांच्याकरीता विविध स्पर्धेचे आयोजन दि.०४/०४/२०२२ ते १०/०४/२०२२ पर्यंत जिल्हा स्टेडियम चंद्रपुर येथे केले होते. यात विविध सांघिक तथा वैयक्तिक स्पर्धाचा समावेश होता. या स्पर्धेत भद्रावती पंचायत समिती ने संपुर्ण सहभाग घेतला. यात वैयक्तिक गायन स्पर्धेत प्रतिभा कवाडे विषय तज्ञ, पंचायत समिती भद्रावती यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.   
 आशिष  चुनारकर, जिल्हा परिषद शाळा कोंडा यांनी बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. अजय  मुसळे जिल्हा परिषद शाळा चिरादेवी व अजय  गाडगे जिल्हा परिषद शाळा ढोरवासा यांनी दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत जिल्ह्यातून द्वितीय क्रमाक प्राप्त केला तर 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत पंचायत समिती भद्रावती च्या बांबोळे मॅडम यांनी दुसरा क्रमांक प्राप्त केला.         
सर्व स्पर्धकांचे डॉ.मंगेश आरेवार संवर्ग विकास अधिकारी, भद्रावती, प्रयोगशील, तंत्रस्नेही आणि धडाडीचे गटशिक्षणाधिकारी श्री.धनपालजी फटिंग प.स.भद्रावती व श्री भारतजी गायकवाड केंद्रप्रमुख ढोरवासा यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत