Click Here...👇👇👇

संविधान बचाव, देश बचाव #chandrapur

Bhairav Diwase
संविधान जागर रॅलीने वेधले विद्यार्थ्यांचे लक्ष
चंद्रपूर:- सर्वोदय शिक्षण मंडळ द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र शासन सामाजिक समता कार्यक्रम संविधान जागर रॅली आयोजित करण्यात आली.


भारतीय संविधानाचा स्वीकार ज्या दिवशी केला गेला तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिन म्हणून पण ओळखला जातो. १९४९ मध्ये यादिवशी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला. २६ जानेवारी १९५० पासून संविधान देशात लागू झाले. १९ नोव्हेंबर, २०१५ रोजी केंद्रीय सामाजिक आणि सशक्तीकरण मंत्रालयाने २६ नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी महाविद्यालय विद्यार्थ्यांनी दि. १२ एप्रिल ला महाविद्यालय परीसरात पथनाट्य सादर करून संविधान वाचन केले व‌ महाविद्यालयीन परीसरात रॅली काढण्याताना "नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली लोकशाही"

संविधानाची हीच ग्वाही,
उच्च-नीच कोणी नाही

संविधान भारताचा आधार,
कोणी नसेल निराधार
या घोषणा देण्यात आले.