भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर #chandrapur

Bhairav Diwase
भाजयुमो युवा वॉरियर्स शाखा फलकाचे शिवानी दाणी यांच्या हस्ते अनावरण
चंद्रपूर:- दिनांक 27/04/2022 रोजी,
भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश महामंत्री शिवानी दाणी, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वामन तूर्के, युवा वॉरियर्स विदर्भ विभाग संयोजक देवदत्त डेहनकर  चंद्रपूर जिल्ह्यात संघटनात्मक दौऱ्यावर येत असून माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रभारी अंकुश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा संघटन महामंत्री मिथलेश पांडे यांच्या नेतृत्वाखाली भद्रावती तालुक्यात व वरोरा तालुक्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्स च्या शाखा फलकाचे अनावरण भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी यांच्या हस्ते होणार आहे.
तरी या तालुक्यातील दोन्हीही कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चाच्या तसेच सर्व आघाडी चा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव करण देवतळे, जिल्हा महामंत्री इमरान खान, भाजयुमो जिल्हा महामंत्री सचिन नरड, जिल्हा उपाध्यक्ष महेश श्रीरंग यांनी केले आहे.