Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

सन्मान पत्रकारितेतील चाणक्याचा.

जेष्ठ पत्रकार प्रा. महेश पानसे राज्य भुषण गौरव पुरस्काराने सन्मानित.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात 
 चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार सन्मा. प्रा. महेश पानसे सर यांनी गेल्या २५ वर्षापासुन पत्रकारिता क्षेत्रात दिलेले योगदान, त्यांचे संघटन कौशल्य व त्यांनी आतापर्यंत अनेक नवख्या तरुणांना पत्रकारिता क्षेत्रात आणुन आपल्या मार्गदर्शनात घडविले या करीता पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्य भुषण गौरव पुरस्कार त्यांना नागपुर येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अधिवेशनात प्रदान करण्यात आला.


पुरस्कार प्रदान करतांना देशाचे माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.वसंतराव मुंडे, दै. महासागर वृत्तपत्राचे मालक, जेष्ट संपादक मा.श्रीकृष्ण चांडक व ईतर मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला राज्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यातील पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत