विज टंचाई च्या विरोधात भाजपा पोंभूर्णा च्या वतीने "कंदील आंदोलन" #chandrapur


पोंभुर्णा:- दिनांक २४ एप्रिल २०२२ ला भारतीय जनता पार्टी, पोंभुर्णा तालुक्याच्या वतीने माजी अर्थमंत्री मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आणि मा.श्री. देवराव दादा भोंगळे जिल्हाध्यक्ष, भाजपा चंद्रपूर यांच्या सूचनेप्रमाणे "कंदील आंदोलन" करून या अंधळ्या बहिऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला.
सतत लोडशेंडिंग करून सामान्य लोकांच्या जिवाशी चालविलेला खेळ आणि भरमसाठ बिल पाठवून लोकांची लूट करून ऐन उन्हाळ्यात हे सरकार जनतेला शिक्षा देत आहे. अशा सरकारचा कंदील दाखून निषेध करण्यात आला.
यावेळी कु. अल्का आत्राम जिल्हाध्यक्षा भाजपा महिला आघाडी, सुलभा गुरूदास पिपरे नगराध्यक्षा न.पं. पोंभूर्णा, अजित मंगळगिरिवार उपाध्यक्ष, ऋषी कोटरंगे शहर अध्यक्ष, गजानन मुडपूवार महामंत्री, गुरूदास पिपरे महामंत्री, अजय मस्के अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, रोहिणी ढोले सभापती, आकाशी गेडाम सभापती, संजय कोडापे नगरसेवक, दर्शन गोरंटिवार नगरसेवक, स्वेता वनकर नगरसेविक, रोशन ठेंगणे, मोहन चलाख जिल्हा उपाध्यक्ष, संज्योग शिरभैय्ये, वैशाली बोलमवार महिला अध्यक्ष, रजिया कुरेशी सचिव, वणकर ताई, मंदा पिपरे, बंडू बुरांडे सरपंच जामखुर्द, दशरथ फरकडे, रंजीत पिंपळशेंडे उपसरपंच भिमणी, महेंद्र कामीडवार, अरुण कुत्तरमारे, सुगत गेडाम, गजानन गेडाम, साधुराम कडते, प्रदीप पिंपळशेंडे, राजू ठाकरे, अजित जांबूलवार आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत