Top News

पित्याने आपल्या पोटच्या विवाहित मुलीचा केला विनयभंग #Debauchery


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
भद्रावती:- लहान बाळांचा जन्म ते तारुण्याचा प्रवास, व लग्न मात्र आपल्या पोटच्या मुलीवर वासनांध बापाने अशोभनीय कृत्य केल्याने नागरिक चांगलेच संतापले आहे.
पित्याने आपल्या पोटच्या विवाहित मुलीचा विनयभंग करून पवित्र नात्यालाच काळीमा फासणा-या 53 वर्षीय पित्यास मुलीच्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार पिडीत मुलगी ही विवाहित असून तिचे सासरच्या मंडळींशी पटत नसल्याने ती पतीला सोडून जवळपास मागील 10 महिन्यांपासून आपल्या आई-वडीलांकडे आली होती. याच दरम्यान प्रबळ वासनेच्या आहारी गेलेल्या आरोपी वडीलाने पोटच्या मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर पिडीत मुलीने याबाबत भद्रावती पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याआधारे पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने