जाहिरात... Advertisement... विज्ञापन

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन होणार! #Exam #offline


मुंबई: राज्यात कोरोनाची लाट जवळपास संपली आहे. सर्व विद्यापीठातील परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे सोमवारी त्यांनी ऑनलाइन बैठकीत सर्व विद्यापीठांशी संवाद साधला. त्यानंतर हा निर्णय घेतल्याचे समजते.
राज्यात आतापर्यंत कोरोनाची लाट होती. मात्र, दीड महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झालेली आहे. त्यामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता महाविद्यालये ऑफलाइन सुरू असताना विद्यापीठांद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे.
याबाबत विद्यार्थी संघटनाही आक्रमक असल्याचे दिसून आले. त्यातून काही विद्यापीठाद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्याचे ठरविले. मात्र, सोमवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक घेऊन परीक्षांचा आढावा घेतला. त्यात त्यांनी सर्व विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेण्याबाबत सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच ट्विट #tweet

कुलगुरूंच्या बैठकी मध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत. परीक्षा घेताना विध्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे, दोन पेपर मध्ये 2 दिवसाचे अंतर असणार आहे,परीक्षा मे मध्ये न घेता 1 जून ते 15 जुलै पर्यंत होतील असे मा. कुलगुरूनी निश्चित केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत