Top News

कांग्रेसचा आनंदोत्सव म्हणजे तर गुढघ्याला बाशिंग बांधण्याचा प्रकार:- डॉ गुलवाडे #chandrapur


चंद्रपूर:- शहर भाजपा प्रणित महानगरपालिकेच्या पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. दरम्यान भाजपाची सत्ता विकासाचा झंझावात ठरली आहे.महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या विशेष प्रयत्नाने महानगरपालिका क्षेत्रात विविध विकासकार्याची शृंखला उभी झाली.
नगरपालिका व नंतर झालेली महानगरपालिकेच्या 130 वर्षाच्या इतिहासातील भाजपाच्या 7.5 वर्षाच्या सत्तेत कायापालट झाला. सत्ता नसली तरी निधी खेचून आणला. ही बाब काँग्रेसची पोटदुखी वाढवत आहे.वाट्टेल ते आरोप झाले पण ते बिनबुडाचे निघाले. जिल्हाधिकाऱ्यांनी समिती स्थापन करून कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली. पण, "खोदा पहाड निकला चुहा," ही स्थिती विरोधकांची झाली.
आता सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. काही महिने थांबायचे आहे. आरोप करून सत्ता मिळेल असेल काँग्रेसला वाटत असेल तर, तसे होत नाही. आरोप करणे सर्वात सोपे काम आहे,आणि विकास करणे कठीण. काँग्रेसचे असे आनंदी होणे, जल्लोष करणे गुढघ्याला बाशिंग बांधल्या सारखे आहे. मनपातील भाजपाचे सरकार जात नाही आहे, कार्यकाळ संपला आहे. छोटासा ब्रेक आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने