Top News

प्रदूषण नियंत्रण मंडळाची माणिकगड सिमेंट कंपनीत प्रदूषणाची पाहणी #Korpana

कंपनीला दिली करणे दाखवा नोटीस
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रभूषणाने शहरातील नागरिक अत्यंत हवालदिल झाले आहे कंपनीचे प्रदूषण एवढे वाढले की नागरिकांच्या आरोग्याविषयी अनेक समस्या समोर येत आहे त्या बाबत अनेक नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण कृती समिती, व सामाजिक संघटनांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या कडे लेखी तक्रारी करण्यात आल्या त्याच कारणाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अतुल सातफडे, उपप्रादेशिक अधिकारी, व त्यांची चमू यांनी दिनांक 25 एप्रिल 2022 ला माणिकगड सिमेंट कंपनीत गुप्त पने भेट दिली त्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मोका पंचनामा करून अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, युनिट-माणिकगड सिमेंट वर्क्स, गडचांदूर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून वायू, जल, व ध्वनी प्रदूषण असे तिन्ही प्रकारचे प्रदूषण सुरू आहे. गडचांदूर येथील प्रदूषण कृती समितीने प्रदूषणाविरुद्ध जोराची लढाई सुरू केली आहे याला नागरिकांचा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे.
माणिकगड कंपनीच्या तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना अनेक प्रदूषणविषयक त्रुटी आढळून आल्या. उद्योगात वायू, जल व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात आढळून आले. नगरपरिषदेच्या इमारतीवर लावण्यात आलेल्या धूळ मोजणी यंत्राला सुद्धा भेट देण्यास प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कृती समितीने भाग पाडले. हे यंत्र अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून कोणीही अधिकारी या ठिकाणी येऊन तपासणी करीत नाही, तसेच अंदाजे अहवाल देत असल्याचे लक्षात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर,सतिश बिडकर, सचिन भोयर, वैभव राव , प्रा. आशिष देरकर, घन:श्याम पाचभाई, शैलेश लोखंडे, आदी कृती समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.
बोर्डाने सिमेंट उद्योगाला चालविण्यास संमती दिली आहे. ठरवून दिलेल्या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन होत असल्याचे नोटिसीत नमूद आहे. माणिकगड सिमेंट कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसीमध्ये कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये?, उद्योगाचे उत्पादन बंद करण्याचे निर्देश का देऊ नयेत? याबाबत हे पत्र मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी ए. एम. करे यांच्या सहीनिशी देण्यात आले आहे.
कंपनीला ज्या अटींवर परवानगी देण्यात आली, त्यावेळी ठरवून देण्यात आलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. प्रत्यक्ष भेटीदरम्यान कंपनी परिसरात हे अनुभवास आले. शहरातील जनतेला सुद्धा सिमेंट कंपनीच्या धुळीचा नाहक त्रास आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत बनलेले दिसून आले
अतुल सातफडे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने