Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक #gondpipari

चंद्रपूर:- गोंडपीपरी शहरातील पंचशील वार्डातील ५५ वर्षीय इसमास अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी पोलीसांनी अटक केली आहे. सुनील देवगडे असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गोळीबार, हत्या लूटमार, बलात्कार यासारखे गुन्हे दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात अवैध धंदे व अवैध हत्यार बाळगणाऱ्यांची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
गोंडपिपरी शहरातील पंचशील वार्डात हातात तलवार घेऊन दहशत पसरवित असल्याच्या माहितीवरून गोंडपीपरी पोलीसानी एका इसमाच्या घरी छापेमारी केली असता सुनील केशव देवगडे यांच्या बाथरूमच्या लॉप्टवर ७० सेमी लांबीची धारदार लोखंडी तलवार आढळल्याने त्यास ताब्यात घेऊन भारतीय हत्यार अधिनियम कलम ४, ५, २५ आणि २७ प्रमाणे कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई मार्गदर्शनात गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठानेदार जीवन राजगुरू, पोलीस हवालदार पुरषोत्तम उईके, विलास कोवे, पोलीस शिपाई रतन चव्हाण, अनिल चव्हाण यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत