Top News

चालत्या रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू #death

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- झारखंड येथील काही मजूर येलावरती या कंपनीत संगारेड्डी हैदराबाद जात असताना दक्षिण मध्य रेल्वे लाईन विरुर रेल्वे स्टेशन पोल क्रमांक 1608 जवळ चालत्या रेल्वेतून पडल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली व काही वेळानी पोलीस स्टेशन विरूर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन सदर इसमला उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
झारखंड राज्यातील 18 मजूर कामानिमित्य हैदराबाद येथील येलावरती संगारेड्डी कंपनी हैदराबाद येथे गाडी गाडी नंबर 12194 जबलपूर टू यशवंतपुर या सुपरफास्ट एक्सप्रेस ने जात असताना दक्षिण मध्य रेल्वे लाईनच्या विरूर रेल्वे स्टेशन जवळ काल रात्री 7 वाजता पोल क्रमांक 1608 कुंदन साव बुल्लूसाव वय 19 वर्ष रा. रत्नाग ता. रत्नाग जिल्हा पालमू झारखंड हा युवक चालत्या रेल्वेतून खाली कोसळला व त्याला काही वेळाने विरूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले परंतु काही वेळानी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बल्लारशा येथील जी आर पी एफ प्रमोद घ्यारे, अखिलेश चौधरी यांनी पंचनामा करून सदर मृत्यू देह शवविच्छेदन ना करिता करता पाठवण्यात आले.
आमदार सुभाष धोटे राजुरा व माजी नगराध्यक्ष अरुण धोटे अशोक राजू राव रुग्ण कल्याण समिती सदस्य शहराध्यक्ष युवक काँग्रेस ,राजुरा यांनी डेड बाडी व सोबत असलेल्या मजुरांना जेवणाची सोय करून आपल्या स्वगावी झारखंड येथे जाण्यासाठी ॲम्बुलन्स व खाजगी वाहनाची ची व्यवस्था करून देण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने