Click Here...👇👇👇

शेतात लागलेल्या आगीत सव्वा लाखाचे साहित्य जळून खाक #fire #firenews

Bhairav Diwase
भद्रावती:- शेतात लागलेल्या आगीत सव्वा लाखाचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना भद्रावती तालुक्यातील वडाळा(तु.) शेतशिवारात दि.१ एप्रिल रोजी दुपारी घडली.
या आगीत ठिबक सिंचन, सौर ऊर्जा पॅनल, तुरी व तणस ढिग जळुन खाक झाले. त्यामुळे शेतमालकाचे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे. वडाळा (तु.) येथील अनिता शंकर भरडे यांच्या शेतात ही आग लागली होती. ही आग हळूहळू पसरत त्यांच्या शेताच्या बाजूलाच असलेल्या मंसाराम गजभे यांच्या शेतात पोहोचली व तेथे तणसीच्या ढीगाला आपल्या कवेत घेतले. ही आग धुरे बंधारे जाळण्यातुन झाली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत शेगांव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.