चंद्रपुर:- वाहणांच्या अतीवापरामुळे पर्यावरणाचे स्वास्थ धोक्यात आले आहे. सोबतच याचा मोठा विपरित परिणाम मानवी आरोग्यावरही जाणवत आहे. त्यामुळे आता नागरिक सायकल चालविण्याला महत्व देऊ लागले आहे. यात सातत्याने सुरु असलेल्या जानजागृती मोहिमांची भुमीकाही महत्वाची ठरत आहे. एच.पी.सी.एल.च्या वतीनेही याबाबत पूढाकार घेण्यात आला आहे. त्यांचे हे काम कौतुकास्पद असून शरिर आणि पर्यावरणाच्या स्वास्थासाठी एच.पी.सी.एल. ने सायकलींगची मोहिम गतीशील करत सि.एस.आर. फंडातून यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा असे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
एच.पी.सि.एल.च्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मनविल्या जात आहे. त्या अनुषंगाने आज ररिवारी सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एच.पी.सि.एल.चे चिफ मॅनेजर नितीन सहारे, जगताप व्यंकटवार, अंकित त्रिवेदी, मनिष कुमार, सरदार पटेल महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, सिराज मुन, आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉ. अमल पोद्दार आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, एच.पि.सि.एल.च्या माध्यमातून दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. साधारणत: कोणताही उद्योग आपल्या वस्तु विकण्यासाठी काम करतो मात्र एच.पि.सी.एल. आवश्यक असले तेव्हाच आमच्या गॅस आणि पेट्रोलचा वापर करा असा संदेश देत आला आहे. आणि हे खरे आहे. प्रकृतीने दिलेली संसाधने ही मर्यादीत आहे. मात्र जिवनमान गतीशील करण्यासाठी त्याचा होत असलेला अतिवापर भविष्यासाठी धोक्याचा आहे. आता हळूहळू समाजही ही गोष्ट स्विकारु लागला आहे. गरजेपुरतीच वाहणांचा वापर करण्याकडे नागरिकही आता भर देत आहे.
दिल्ली येथे सायकल स्टॅंड सुरु करण्यात आले आहे. एका जागेवरुन दुस-या जागेवर जाण्यासाठी तेथील नागरिक या स्टॅंडचा वापर करतांना दिसत आहे. याचा परिणाम दिल्लीतील प्रदुषणासह वाहतुक व्यवस्थेवही होत आहे. एच.पि.सि.एलने. ही चंद्रपूर जिल्ह्याला मोठा सामाजिक दाईत्व निधी देत अशा प्रकारचा उपक्रम सुरु करावा असे आवाहण यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगवार यांनी केले.
चंद्रपूर जिल्हा हा प्रदुषण आणि उष्णतेत देशात प्रसिध्द आहे. मोठा प्रमाणात वन आच्छादन असुनही आम्हाला प्रदुषण आणि उष्णतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याचा परिणाम आमच्या आरोग्यावर होत आहे. प्रवासासह व्यायामाचे माध्यम असलेल्या सायकला वापर करुन आम्ही शरिर आणि पर्यावरण दोघांचेही स्वास्थ उत्तम ठेऊ शकतो. त्यामुळे चंद्रपूरात पुन्हा सायकलींचा वापर वाढावा यासाठी निश्चितपणे आमचे प्रयत्न असणार असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. ⬜ यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी हिरवी झेंडी दाखविल्या नंतर सायकल स्पर्धेला सुरवात झाली. यात शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेलता होता.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत